संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव.
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही...! जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपणा संपतो.
"जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी हे आपलं नुकसान करण्यासाठी नसतात, तर आपल्या अंतर्गत असलेली शक्ती व सामर्थ्य यांना उत्तेजीत करून यश प्राप्त करण्यासाठी असतात."
"नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते."
"मिले हुए समय को ही अच्छा बनाए । अगर अच्छे समय की राह देखोगे तो पूरा जीवन कम पड़ जायेगा।"
"जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे."
"अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते. कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते."
"ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत, तो तोडताना दहा वेळा विचार करतो. आयतं मिळालं मग ती की माणूस एका झटक्यात तोडतो, झाडे असो की नाती."
"माणूस एक अजब रसायन आहे, आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत."
"आपले डोळे तेचं लोकं उघडतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो."
" प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक रहा. प्रतिष्ठा समाजाकडुन मिळते म्हणून समाजाचे आभारी रहा. परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडुन मिळतो त्यापासुन सावध रहा."
"वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादनं आहेत आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल."
"पायाचं दुखणं आणि संकुचित विचार
माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत,
तूटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःच भाग्य लिहू देत नाही,
कामाचा आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठ होऊ देत
नाही,
आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे
हा विचार
माणसाला माणूस होऊ देत नाही."
"आयुष्यात कधीच कोणावर जास्त " अवलंबून " राहू नका कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते ."